बातम्या

औरगांबादमधील शाळा बंद

सकाळ न्यूज नेटवर्क

गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सुटावा यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील अनुदानित संस्थाचालकांनी एल्गार पुकारला आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनासाठी सोमवारी (ता. 26) औरंगाबादेत एकदिवसीय लाक्षणिक शैक्षणिक "बंद' पुकारला आहे. त्यामुळे शहरातील जवळपास 2 हजार 122 शाळांनी बंद आहेत.

विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यासंदर्भात शासनाकडून अनेकदा आश्वासने देण्यात आली; परंतु एकही आश्वासनाची पूर्तता शासनाने केली नाही. लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहितेपूर्वी शासनाने शाळांना अनुदानित घोषित करून विनावेतन शिक्षकांना न्याय द्यावा. विनाअनुदानित शिक्षकांसाठी अनुदानित शाळेतील संस्थाचालकांनी पुढाकार घेऊन एकदिवसीय शाळा बंदचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार औरंगाबादेत सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळा औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमांच्या शाळा "बंद' होत्या. तर सीबीएसईच्या अनेक शाळांनी शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. शिवाय आगामी काळात विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यामध्ये जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्था महामंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना, कास्ट्राईब संघटना, प्राथमिक मुख्याध्यापक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक सेना, शिक्षकेत्त कर्मचारी संघटना, प्रहार शिक्षक संघटना, शिक्षक क्रांती यांच्यासह विविध संघटनांनी सहभाग घेवून पाठिंबा दिला आहे. 

Web Title: Aurangabad all schools "closed"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : यवतमाळला चार दिवसांचा येलो अलर्ट

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

SCROLL FOR NEXT