liquor 
बातम्या

चक्क रुग्णवाहिकेतुन दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद.....

गोविंद साळुंखे

शिर्डी : लॉकडाऊन Lockdown कालावधीत पोलीस Police बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैधरित्या दारूची Alcohol विक्री करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी पकडले आहे व त्यांना अटक Arrested केले आहे. कोरोना काळात अनेक जण समाजसेवा करुन समाजाबांधवा पुढे एक आदर्श निर्माण करत आहेत.

मात्र काही महाभाग त्याचा गैरफायदा घेत आहेत. अहमदनगरच्या संगमनेर Sangamner शहरात रुग्णवाहिकेमधून अक्षरशः देशी दारूची वाहतूक केली जात आहे. शहर पोलिसांनी हा प्रकार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. संगमनेर शहर पोलीस शहरात नाकाबंदी दरम्यान, रुग्णवाहिकेत ambulance रुग्ण नसताना, देखील रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. Arrested for transporting liquor in ambulance

पोलिसांनी सायरन का वाजवतो अशी विचारणा केली असता, रुग्णवाहिका चालकाची भंबेरी उडाली. त्यानंतर रुग्णवाहिकेची झडती केली असता. त्यामध्ये देशी दारूचे ७ बॉक्स आढळून आले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

SCROLL FOR NEXT