बातम्या

सासरच्या जाचाला कंटाळुन मुलाचा खून करून विवाहितेची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क

हडपसर : ''अमित तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, पण मला वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव. सासू सुजाता ही माझा वारंवार छळ करीत आहे.'',अशी चिठ्ठी जान्हवीने आत्महत्येपूर्वी लिहिली आहे. जान्हवीने स्वतःच्या दोन वर्षाच्या कोवळ्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे शनिवारी  पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

सासरच्या छळास कंटाळून ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व कौटूंबिक हिसाचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सासु-सासऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूनम उर्फ जान्हवी (वय २२, रा. टिळेकरवस्ती) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवांश असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. जान्हवी व तिचा पती अमित यांचे भांडण नव्हते, याउलट दोघाचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. मात्र सासुकडुन जान्हवीला जाच केला जात होता. या जाचाला कंटाळूनच तिने टोकाचे पाउल उचलले. एवढचे नाही, तर आपल्या पाठीमागे आपल्या कोवळ्या लेकराचे हाल होऊ नयेत, म्हणून त्यालाही आपल्याबरोबर नेले.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमचा पती अमित दत्तात्रय कांबळे हे हडपसर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहेत. ते रात्रपाळीत कामाला होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते घरी गेले असता. घराची खिडकी उघडी होती व बेडरूमची लाईट चालू होती. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असता साडीच्या सहाय्याने पूनम हिने फॅनला गळफास घेतल्याचा व मुलाचा उशीने गळा दाबून खून केल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात पूनमने या घटनेस कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे. 

पूनमचे वडील सुरेश जगताप म्हणाले, ''मुलीला सासुरवास होता. तीचे लग्न चार वर्षांपूर्वीच झाले होते. ती सतत आम्हाला फोन करून सासरवास होत असल्याची माहिती देत. मात्र परिस्थित सुधारेल या हेतूने आम्ही तिला समजावून सांगत होतो. आम्ही घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

Web Title: After Killing Her Child Married women Committed Suicide

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mint Water Benefits : उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचे पाणी, आरोग्याला होतील ‘असे’ फायदे

Today's Marathi News Live: देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे; निलेश लंके

Shirur News: बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

SCROLL FOR NEXT