actor
actor  
बातम्या

अभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 50 हजारांना लुटले

दिलीप कांबळे

पिंपरी - तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची पोलिसात Police  तक्रार द्यायची नसेल तर सव्वा लाख रुपये दे’ अशी मागणी करत एका कार चालकाने मराठी अभिनेता योगेश सोहोनी  Yogesh Sohoni याला एटीएम ATM मधून पन्नास हजार रुपये जबरदस्तीने काढण्यास लावून लुटले आहे. Actor Yogesh Sohoni was robbed of Rs 50,000 on the Pune-Mumbai expressway

ही घटना शनिवारी Saturday सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर Pune-Mumbai expressway सोमाटणे एक्झिट जवळ घडली.अभिनेता योगेश सोहोनी  यांनी याबाबत शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात स्कॉर्पिओ कार Car चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहोनी शनिवारी सकाळी त्यांच्या कार मधून मुंबईहून पुण्याला येत होते. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास सोमाटणे एक्झिट जवळ एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. स्कॉर्पिओ चालकाने सोहोनी यांना हात दखाबून थांबण्यास सांगितले. त्यामुळे सोहोनी यांनी कार थांबवली. स्कॉर्पिओ मधून एक व्यक्ती उतरला आणि सोहोनी यांच्याकडे आला.  Actor Yogesh Sohoni was robbed of Rs 50,000 on the Pune-Mumbai expressway

‘तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. एका इसमाला दुखापत झाली आहे. या अपघाताची कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायची नसेल तर तू एक लाख 25 हजार रुपये दे. नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल.’ अशी आरोपीने सोहोनी यांना धमकी देऊन पैशांची मागणी केली. सोमाटणे फाटा येथील एटीएम जवळ नेऊन सोहोनी यांना 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडले. सोहोनी यांनी एटीएम मधून पैसे काढले असता ते पैसे जबरदस्तीने घेऊन आरोपी स्कॉर्पिओ चालक पळून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

SCROLL FOR NEXT