बातम्या

रुपया वधारला  सोन्यात घसरण 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:  सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी १७० रुपयांनी घसरून ३८,३९० रुपयांवर जाऊन पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते चांदीच्या भावातही घट होऊन तो प्रति किलोला १२० रुपयांनी घटून ४७,५८० रुपयांवर जाऊन पोहोचला. बुधवारी चांदीचा प्रति किलो बंद भाव ४७,७०० रुपये, तर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ३८,५६० रुपये होता.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांमुळे देशांतर्गत शेअर बाजारांची 'चांदी' होत असतानाच शुक्रवारी रुपया मजबूत झाल्याने सराफा बाजारात सोन्याच्या भाव घसरला  .

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणण्यासाठी विविध उपाय योजण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी सत्रांतर्गत व्यवहारांमध्ये शेअर बाजारात तेजी उसळल्याचे दिसून आले. सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) एका दिवसांत २२८४.५५ अंकांनी वधारला.एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांच्या मते केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेअर बाजाराा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्यामुळे दिल्ली सराफा बाजारातील २४ कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅम भावामध्ये १७० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. सीतारामन यांनी गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनांची घोषणा केल्यामुळे शुक्रवारी सत्रांतर्गत व्यवहारांमध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ६६ पैशांनी मजबूत होऊन ७०.६८च्या पातळीवर पोहोचला. केंद्र सरकारने देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचा दर २५.१७ टक्क्यांवर आणून ठेवला आहे. सध्या हा दर ३४.९४ टक्के आहे. न्यूयॉर्क बाजारातही सोन्याच्या भावात तेजी नोंदविण्यात आल्याने ते प्रति औंस १५०३ डॉलरवर आणि चांदी प्रति औंस १७.८७ डॉलरवर पोहोचले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT