बातम्या

हिंगोली : गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क

हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटांमध्ये एकाच कुटूंबातील तिघा जणांचा भाजून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ) पहाटेच्या सुमारास घडली आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोनाजी दळवी यांचे घर आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास सोनाजी आनंदराव दळवी (वय 55) त्यांची पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (वय 45)  व त्यांची मुलगी पूजा सोनाजी दळवी (वय 25)  हे घरात झोपले होते. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये घरातून आगीचा मोठा भडका उडाला. अचानक लागलेल्या आगीमुळे झोपेत असलेल्या सोनाजी दळवी कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका खूप मोठा असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. त्यानंतर वसमत येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दल तसेच कुरुंदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव नेटके जमादार शंकर इंगोले, तुकाराम आमले, जोगदंड यांच्यासह बाजार समितीचे सभापती राजू पाटील, दत्‍तरामजी इंगोले व नागरिकांनी आगीवर मिळेल त्या साहित्याने पाणी ओतून आग नियंत्रणात आणली. मात्र या घटनेमध्ये तिघांचाही मृत्यू झाला. दरम्यान मयत पूजा दळवी ही पुणे येथील होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे पूजा काही दिवसापूर्वी कुरुंदा येथे आली होती असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे कुरुंदा परिसरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: 3 die d\from same family due to cylinder blast

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destination : उन्हाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: कारमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

SCROLL FOR NEXT