यवतमाळ : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन! SaamTVnews
ऍग्रो वन

यवतमाळ : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन!

सतत नापिकी तथा कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केली असे स्थानिकांनी सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

यवतमाळ : नेर तालुक्यातील मालखेड बुद्रुक येथील शेतकरी प्रकाश उत्तम मानकर (वय ५४) यांनी आपले भाऊ पुरुषोत्तम मानकर यांच्या शेतामध्ये आज दिनांक २० मार्च रोजी सकाळी ७ च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Yavatmal Ner Taluka Farmer's Suicide)

हे देखील पहा :

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सदर शेतामध्ये धाव घेतली तथा स्थानिक पोलीस पाटील यांनी नेर पोलीस (Police) स्टेशनला या बाबत माहिती दिली. सदर मृतक शेतकरी (Farmer) यांचे शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.

मृतक शेतकरी यांच्याकडे १० एकर शेती असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उत्तर वाढोना येथील बँकेचे कर्ज (Loan) असल्याची प्राथमिक माहिती नागरिकांनी दिली. सतत नापिकी तथा कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केली असे स्थानिकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी असा आप्त परिवार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT