वर्ध्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा हल्ला सुरेंद्र रामटेके
ऍग्रो वन

वर्ध्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा हल्ला

शेतकरी आर्थिक अडचणीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरेंद्र रामटेके

वर्धा - कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या पाहणीत कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीने हल्ला केल्याचे दिसले आहे. पंचेचाळीस दिवसातच गुलाबी अळीने हल्ला केल्याने शेतकरी Farmer आर्थिक संकटात सापडले आहे. फवारणीचा खर्च करावा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडल्याने कपाशी पीक धोक्यात आले आहे. कृषी विभागाच्या आत्माच्या संचालक डॉ. विद्या मानकर Vidhya Mankar यांनी लाईट ट्रॅप आणि निंबोळी Nimboli अर्कची फवारणी करण्याचे उपाय सुचविले आहे.

हे देखील पहा -

शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी डोलदार दिसत असली तरी पीक येण्याचे चिन्ह दिसत नाहीत आर्वी तालुक्यातील टेंभरी या गावातील शेतकरी सुखदेव गोविंद चौधरी यांच्या शेतातील पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. डोंमकळी अवस्थेत असलेल्या अळीमुळे टेंभरी गावातील व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून चिंता वाढली आहे .

कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी आर्वी तालुक्यातील टेंभरी येथील कपाशी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात पाहणी केली असता डोंमकळीच्य फुलांमध्ये गुलाबी बोंड अळी दिसून आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुलाबी बोंड अळी दिसून येत आहे. त्यांनी तात्काळ निंबोळी अर्काची फवारणी करावी.

सोबत लाईट ट्रॅप शेतात लावावेत त्यामुळे बोंड आळीला कंट्रोल करता येईल तसेच इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पहाटेच्या सुमारास शेतात फेरफटका मारून कपाशी पिकातील फुले उमळून पहावे त्यात बोंड काळी दिसल्यास तात्काळ कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आहे आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

SCROLL FOR NEXT