वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात विनोद जिरे
ऍग्रो वन

वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात

जिल्ह्यात पावसाने (Beed District) गेल्या वीस दिवसांपासून दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आले आहेत.

विनोद जिरे

बीड: जिल्ह्यात पावसाने (Beed District) गेल्या वीस दिवसांपासून दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आले आहेत. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, कापूस पिवळे पडू लागल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 397 मिमी पाऊस झाला आहे. तर आजही नदी, नाले आणि ओढ्याला पाणी नसल्यामुळे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यानंतरही, पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पुन्हा दुष्काळ येतो की काय ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी तब्बल चार लाख हेक्‍टर मधील सोयाबीन पिकाचा पेरा करण्यात आलेला आहे. सोयाबीनला भाव चांगला असल्यामुळे शेतकरी आनंदात होता. मात्र शेंगा लागण्याच्या वेळी पावसाने दडी दिल्याने उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे..

तर यामुळं आता बी बियाणे आणि खतासाठी केलेला खर्च देखील निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यातून चिंता व्यक्त केली जात असून पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; सव्वा तास बंद दाराआड काय चर्चा झाली?

Richa Ghosh : 4 सेंटीमीटरने केला घात! अवघे 6 रन्स शिल्लक असताना हुकलं शतक; Video पाहून तुम्हीही चुकचुकाल

RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Maharashtra Live News Update: ..तर सरकारच्या विरोधात जाणार; मंत्री विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT