वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान, शेतकरी हताश
वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान, शेतकरी हताश दिनू गावित
ऍग्रो वन

वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान, शेतकरी हताश

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव नगरपरिषदेने शहरातील सर्व गटारे बंदिस्त केल्याने, शहरातील गावठी डुकरे अन्नाच्या शोधात शहरालगतच्या दहा ते बारा किलोमीटर परिसरातील हरणखुरी, भुजगाव, रोशमाळ, शिवनिपाडा, पालखा, जुने धडगाव, वडफळ्या, नवागाव, रोजरी, धनाजा, कुसुमवेरी, बोरवन या गावांमध्ये रात्री डुकराद्वारे काढणीला आलेल्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे.

यावर उपाय योजनासाठी वनविभागाला विचारल्यावर गावठी डुकराद्वारे नुकसान केले जात असल्यामुळे आम्ही कारवाई आणि नुकसानभरपाई देऊ शकत नाही, असे उत्तर देण्यात येत आहे. या नुकसानीमुळे अल्पभूधारक शेतकरी हतबल झाले आहे. कमी पर्जन्यमानात मोठ्या कष्टाने अनेक अडचणींना सामोरे जात शेती फुलवली आहे.

हे देखील पहा-

मात्र, काढणीला आलेल्या मका, ज्वारी, भुईमूग आणि भाजीपाला पिकाचे धडगाव शहरातील डुकरे रात्रीच्या वेळेस शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दिवसभर शेतात राबून रात्री डुकरा पासून पिकांची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. धडगाव शहरातील डुकरे आसपासच्या डोंगर शिवारातील जंगलात अन्नाच्या शोधात काढणीला आलेली उभी पीक खाऊन जात आहे.

प्रशासनाने या डुकरांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दीड एकरात भुईमुग पिकाची लागवड करण्यात आली आहे. एका रात्री डुक्कर शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे त्या दिवसापासून रात्रभर जागरण करून, राहिलेल्या पिकाचे राखण करण्यात येत आहे. प्रशासनाने या डुकरांच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढावे.

अन्यथा हरणखुरी गावातील शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. दोन एकर शेतात पावसाळ्या आगोदर मका पिकाची लागवड करण्यात आली होती. डुकरांनी सर्व मक्याची शेती उध्वस्त केली असून, आता पुढच्या पेरणीसाठी शेताची साफ- सफाई करण्यात येत आहे. राहिलेल्या मक्याच्या हिरव्या बुट्टाच्या विक्रीतून फक्त पाचशे रुपये मिळाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

SCROLL FOR NEXT