'या' भेंडीच्या दराने तर इंधनाच्या दराला देखील टाकलं मागं! प्रदीप भणगे
ऍग्रो वन

'या' भेंडीच्या दराने तर इंधनाच्या दराला देखील टाकलं मागं!

श्रावण महिना सुरु झाला की, खवय्यांना मोठ्या प्रमाणात माळरानांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भाज्यांचे वेध लागतात. या मध्ये विशेषतः मलंगगड परिसरातील काकडवाल आणि कुंभार्ली गावच्या माळरानांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या नऊ आरी भेंड्यांची.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : श्रावण महिना सुरु झाला की, खवय्यांना मोठ्या प्रमाणात माळरानांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भाज्यांचे वेध लागतात. या मध्ये विशेषतः मलंगगड Malanggad परिसरातील काकडवाल आणि कुंभार्ली गावच्या माळरानांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या नऊ आरी भेंड्यांची. हिरव्या भेंडी Lady's finger पेक्षा या भेंडीला हिरवा रंग कमी असतो आणि दिसायला थोडीफार पांढरी असते. या भेंडीला असलेल्या नऊ आऱ्यांमुळे त्यांची चव ही काही ठराविक दिवसातच असते. सध्या इंधरांच्या दरांना देखील मागे टाकत सफेद भेंडीने यंदा बाजारात अव्वल असा दर मिळवला आहे.

हे देखील पहा-

ठाणे Thane जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे माळरानांवर विविध फळभाज्यांचे उत्पादन हे घेतले जाते. प्रामुख्याने पावसाळ्यात पाणी अधिक असल्याने भेंडी, पडवळ, शिराळे, आणि पाले भाज्यांचे यांचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जात असते.

मात्र यंदा या सर्व भाज्यांमध्ये सफेद भेंडीचा बाजारात दर हा सर्वाधिक वधारलेला दिसून आला आहे. बाजारात शेतकऱ्यांकडून प्रति किलो ही सफेद भेंडी तब्बल १२० ते १४० रुपये दराने विकत घेतली जात आहे. त्यामुळे यंदा सफेद भेंडी लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी कोरोना महामारी नंतर खरंच अच्छे दिन आले आहेत.

हिरवी भेंडी ही बाजारात सहजच उपलब्ध होत असते. मात्र या हिरव्या भेंडीला देखील मागे सारत यंदा सफेद भेंडीने बाजारात आपली किंमत ही शंभरी पार केली आहे. विशेषता मलंगगड भागातील काकडवाल आणि कुंभार्ली गावच्या माळरानांवर या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. श्रावणात शाकाहारी भाज्यांच्या किंमती या गगनाला भिडत असतात मात्र या सफेद भेंडीने यंदा सर्वाधिक दर हे शेतकऱ्याला मिळून दिले आहे.

या भेंडीचे दर हे सर्वाधिक असल्याने कमी भाजी विक्रेत्यांकडे या ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते. ग्रामीण भागातून जाणाऱ्या महामार्गांच्या ठिकाणी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. सफेद भेंडीच्या पिकाला चांगले दर मिळते मात्र या पिकाचे बियाणे लवकर बाजारात मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निकालापूर्वीच कणकवलीत लागले नितेश राणेंच्या विजयाचे बॅनर

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT