मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मराठवाड्याचा दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीचे वर्णन केले आहे. लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले असून सोयाबीन Soybean शेतात कुजले आहे. सोयाबीनला घाण वास सुटला असून शेतकऱ्यांना सर्व शेती साफ करावी लागणार आहे त्यासाठी किमाण 5 ते 6 हजार रुपये खर्च येणार असल्याच माहिती फडणवीस यांनी मराठवाडा-विदर्भ अतिवृष्टी Marathwada-Vidarbha heavy rain झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद Press conference घेतली त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिली. तसेच सरकार जबाबदारी झटकत असल्याचही ते यावेळी म्हणाले आहेत. (While farmers are in crisis, the government is shirking its responsibility - Devendra Fadnavis)
हे देखील पहा -
पीक विम्यासाठी सरकार अप्रयत्नशील
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यानुसार शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची गरज असल्याच वक्तव्यं देखील त्यांनी यावेळी केलं. ऊस वाहून गेला तर तूर काळी पडली आहे. राज्यसरकारच्या State Government माध्यमातून मदत मिळावी हीच शेतकऱ्यांची Farmers मागणी आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली असून शेतीचा कस पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार आहे शेतकऱ्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत उरली नाही पीक विमा कंपन्यांचे Crop Insurance Company टेंडर राज्यसरकार काढते विमा कंपन्यांच्या अतिशर्थी सरकार बनवते. पण पीक विमा मिळावा म्हणून प्रयत्न करत नाही असा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.
सरकार जबाबदारी झटकत आहे. विजेचे कनेक्शन कापले जात आहेत शेतकरी अडचणीत असतांना सरकारने मदत करायला हवी मात्र सरकार ती करत नाही. विमा कंपन्यानी विमा द्यावा यासाठी आमच्या सरकार मध्ये आंदोलन करणारे आता गप्प का आहेत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
जलयुक्त शिवार मुळे शेती वाचली
जलयुक्त शिवार योजनेत Jalayukta Shivar Yojana नद्यांचे खोलीकरण झाले म्हणून शेती वाचली जलयुक्त शिवार योजनेची काम करण्याची गरज आहे. लोकांनी दिलेली कुजलेली सोयाबीन मुख्यमंत्र्यांपर्यंत CM पोहचवण्याचे प्रयत्न करू आणि जरी सोयाबीन पोहचले नाही तरी आम्ही शेतकऱ्यांचे दुःख आम्ही पोहचवणार आहोत असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं तसेच केंद्राकडून मदत होईलच साधारण 2004 ते 2014 काळात 3700 कोटी केंद्राने महाराष्ट्राला दिले असल्याचही त्यांना यावेळी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.