Washim Water Shortage Saam tv
ऍग्रो वन

Washim Water Shortage : वाशीम जिल्ह्यात जलस्रोतांची पातळी तळाला; केवळ २९५ हेक्टरवर उन्हाळी पेरणी

washim News : राज्यात यंदा चांगला असा पाऊस झाला होता. जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. शिवाय विहीर, बोअरवेल यांचे जलस्रोत देखील भरले होते.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यात सरासरी ५९८९.९५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात जलस्रोतांची पातळी तळाला गेल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना संपत येण्याच्या मार्गावर आला तरी केवळ २९५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. हे प्रमाण केवळ ४.९२ टक्के आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पाण्याअभावी लागवड केलेली नाही.

राज्यात यंदा चांगला असा पाऊस झाला होता. जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. शिवाय विहीर, बोअरवेल यांचे जलस्रोत देखील भरले होते. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवणार नाही; अशी शक्यता वर्तविती जात होती. असे असले तरी देखील अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आतापासून जाणवू लागली आहे. त्यानुसार वाशीम जिल्ह्यात देखील पाण्याची समस्या जनविण्यास सुरवात झाली आहे. 

प्रकल्पातील साठाही खालावतोय 

पेरणीसाठी कालावधी हाती असला तरी सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने यंदा क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या २९५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीत सर्वाधिक २४५ हेक्टर क्षेत्र केवळ उन्हाळी भुईमूग पिकाचे आहे. कूपनलिका, विहिरींनी तळ गाठला आहे. तर प्रकल्पांतील साठाही झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे शेतकरी उन्हाळी पिकांची जोखीम पत्करण्यास धजावत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

उन्हाळी पिकांनाही साठा पडणार कमी 

दरम्यान उन्हाळी पिकांची लागवडीचे क्षेत्र यंदा घटले आहे. वाशीम जिल्ह्यात २९५ हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे. मात्र या पिकांना देखील पुरेसा पाणी साठा पुरेल राहील कि नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अर्थात सध्या तरी पिकांना पाणी दिले जात असले तरी ऐन उन्हाळ्यात हा पाणी साथ कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT