Grapes Farming Saam tv
ऍग्रो वन

Grapes Farming : द्राक्ष बागांना सन बर्निंगचा फटका; वाढत्या तापमानाचा परिणाम

Washim News : नाशिक, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात असते. यानंतर वाशीम जिल्ह्यात देखील काही शेतकरी द्राक्ष लागवड करत उत्पादन घेत असतात. यंदा देखील शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यात मोजकीच लागवड असलेल्या द्राक्ष बागा यंदा चांगल्या बहरल्या आहेत. मात्र अचानक तापमान वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. जिल्ह्यात दुपारी तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. त्यामुळे द्राक्ष फळांवर मोठ्या प्रमाणात सन बर्निंग होत आहे. याचा थेट फटका उत्पादनाला बसणार असून किमान २० टक्के फळं खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

नाशिक, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जात असते. यानंतर वाशीम जिल्ह्यात देखील काही शेतकरी द्राक्ष लागवड करत उत्पादन घेत असतात. यंदा देखील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. सध्या फळ परिपक्व होऊन काही दिवसांची तोडणी केली जाईल. मात्र मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली असून याचा फटका द्राक्ष बागांना बसण्याची शक्यता आहे. 

तापमान वाढू लागल्याने नुकसान 
रिसोड तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी संजय पवार यांनी मोठ्या मेहनतीने द्राक्ष बाग फुलवली आहे. काही दिवसात फळ तोडणी करून ते बाजारात विक्री केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाचा फटका प्रामुख्याने फळबागांना बसत असल्याचे दिसून येत आहे. यात द्राक्ष बागांचे देखील नुकसान होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

शेतकऱ्याला आर्थिक नुकसान 

दरम्यान उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे फळं खराब होत आहेत. तापमानामुळे द्राक्ष लालसर पडत असून ते फेकून द्यावे लागत आहे. परिणामी उत्पादनात देखील मोठी घट होणार असून आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान होणार आहे. या परिस्थितीत नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT