Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha News : तुर बियाणांच्या दरात वाढ; प्रतिकिलो वाढले शंभर रुपये

Wardha News : खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. शेतात यंदा काय काय लागवड करायची याचे नियोजन आखत असून त्यानुसार बियाणे खरेदी करत आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असून बियाणे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. अश्यातच यंदा तुरीच्या बियाण्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता तुरीचे बियाणे खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

खरीप हंगाम (Kharip Hangam) तोंडावर असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. शेतात यंदा काय काय लागवड करायची याचे नियोजन आखत असून त्यानुसार बियाणे खरेदी करत आहे. वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, तुरीची लागवड केली जाते. मात्र यंदा तुरीच्या बियाणे किमतीत वाढ झाली आहे. यंदा बियाणात प्रतिकिलो मागे १०० रुपये किँमत वाढली आहे. अर्थात तुरीचे उत्पादन घेणाऱ्या (Farmer) शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

मागील वर्षी तुरीच्या उत्पादनात घट झाली असल्याने शेतकऱ्यांच्या घरीही बियाणे नाही. तुरीच्या बियाण्याच्या (Wardha) दरात किलोमागे शंभर रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. सरकारने बियाणे व रासायनिक खातंच्या दरावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT