Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : विमा कंपनीकडून सर्व्हे, मदत केव्हा मिळणार; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस

Wardha News : तक्रार करून संबंधित कंपनीद्वारे पाहणी होऊन बरेच दिवस लोटले तरी अजूनही नुकसानभरपाईची रक्कम मिळेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे (Wardha) पंचनामे झाल्यानंतर विमा कंपनीकडून देखील नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेला देखील २-३ महिन्यांचा कालावधी झाला असताना अद्याप शेतकऱ्यांना (Farmer) नुकसानीची मदत मिळालेली नाही. यामुळे मदत कधी मिळणार असा टाहो शेतकरी करत आहेत. (Latest Marathi News)

विमा कंपनीच्या निकषानुसार पावसाच्या ७२ तासांच्या आत कंपनीकडे तक्रार करणे अनिवार्य आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांनी तक्रार करावी. एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यामध्ये शेतकऱ्याचा एक रुपयाचा हिस्सा, तर शासनाचा हजारो रुपयांचा वाटा या विमा कवचात होता. यासाठी कृषी विभागातर्फे मोठी जनजागृती करण्यात आली. त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने पीक विमा योजनेत सहभागी झाले. तक्रार करून संबंधित कंपनीद्वारे पाहणी होऊन बरेच दिवस लोटले तरी अजूनही नुकसानभरपाईची रक्कम मिळेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी आर्थिक अडचणीत

वर्धा जिल्ह्यात यंदा सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन आणि तुरीला मोठा फटका बसला. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे नुकसानीबाबत तक्रार केली. त्यानंतर विमा कंपनीद्वारे तालुक्यात हजारो एकर पीक क्षेत्राचा सर्व्हे करण्यात आला. मात्र, अद्यापही नुकसानग्रस्त शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. दिवाळीच्या तोंडावर बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकाची उत्पादकता घटल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीक विम्याची मदत केव्हा मिळणार या आशेवर किती दिवस काढावे लागतील हा ज्वलंत प्रश्न असून वरिष्ठ स्तरावर दखल घेत कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT