Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha: शेतकरी भर थंडीत बसले आंदोलनाला; नुकसान भरपाईची मागणी

शेतकरी भर थंडीत बसले आंदोलनाला; नुकसान भरपाईची मागणी

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : वर्ध्याच्या सालोड (हिरापूर) परिसरात कालव्याचे खोदकाम करण्यात आले. रब्बी हंगामाच्या तोंडावर खोदकाम केल्याने शेतकऱ्यांना (Farmer) पाणी मिळण्यास अडचण निर्माण झालीय. त्यामुळे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच मुक्काम (Wardha) करत दोन रात्री थंडीतच काढल्यात. प्रशासनाने नुकसान भरपाईबाबत लेखी पत्र द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. (Maharashtra News)

सालोड शिवारात वर्धा- नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाकरिता निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे खोदकाम करण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पान शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पाणी मिळण्यास अडचण आल्याने नुकसानीची भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खड्ड्यातच ठिय्या

शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कालव्याच्या खोदकाम केलेल्या खड्ड्यात ठिय्या आंदोलन सुरू केल. प्रशासनाकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच अंथरूण, जेवण बोलावून रात्र काढली. प्रशासनाने याबाबत तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT