Farmer Loan Saam tv
ऍग्रो वन

एक रकमी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कृषी कर्ज देण्यास बँकाचा नकार

एक रकमी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कृषी कर्ज देण्यास बँकाचा नकार

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : बँकाच्या बदललेल्या आर्थिक धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कृषी कर्जाचे वन टाइम सेटलमेंट (एक रकमी परतफेड) करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmer) आता नवीन कृषी कर्ज देण्यास बँकांनी (Bank) नकार दिला आहे. सोबतच कर्जमाफीमुळे सीबीएल (CIBIL) खराब झालेल्या शेतकऱ्यांना आता कृषीपूरक व्यवसायावर कर्ज मिळणार नाही. यामुळे आता आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात जाणार आहे. एकीकडे ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता बँकांच्या बदललेल्या धोरणाचा फटका बसतांना दिसत आहे. (Wardha News Farmer Crop Loan)

वर्धा (wardha) तालुक्याच्या सावली येथील शेतकरी हनुमान शिद यांच्याकडे तीस एकर शेती आहे. यांच्यावर नऊ लाख रुपये कृषी कर्ज (Crop Loan) होतें. त्यांनी बँकेशी चर्चा करून वन टाइम सेटलमेंट करून आपले कर्ज 22 एप्रिलला भरले. यानंतर त्यांनी गावातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत नवीन कृषी कर्जसाठी अर्ज केला. सुरवातीला त्यांना त्याच्यावर कोणतेही कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र आणण्यास सांगण्यात आले. ते दिल्यावर विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. मात्र आता बँकेने धोरणात बदल झाल्याचे कारण सांगून नवीन कृषी कर्ज देता येणार नसल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कृषी कर्जाचे वन टाइम सेटलमेंट (एक रकमी परतफेड) करून बँकेचे कर्ज भरले. मागील वर्षांपर्यंत वन टाइम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कृषी कर्ज दिल्या जात होते. मात्र आता बँकानी आपली धोरण बदलली आणी शेतकऱ्यांना नवीन कृषी कर्जसाठी नकार देण्यात आलाय.

कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही फटका

एवढंच नव्हे तर बदलेल्या या धोरणाचा फटका कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे सीबीएल (CIBIL) स्कोर कमी झाल्याचे कारण सांगून त्यांना कृषीपूरक व्यवसाय वर कर्ज देणे बंद करण्यात आले आहे. यामुळे दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, शेळीपालन, अन्नप्रक्रिया उद्योग, सिंचन इ. कर्ज मिळणे बंद झाले आहे.

राज्‍य स्‍तरीय समितीशी पत्रव्‍यवहार

या संदर्भात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वैभव लहाने यांना विचारले असता त्यांनी वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक कृषी कर्ज देत नसल्याबाबत तक्रारी आल्या आहे. बँकांनी आपल्या धोरणात बदल केल्याने त्यांना नकार दिला जातं आहे. या संदर्भात राज्य स्तरीय बँकर समितीला पत्रव्यवहार करण्यात आले असून पुढील बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याच सांगितलं.

पन्‍नासहून अधिक शेतकऱ्यांचे सेटलमेंट

साधारणतः वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण 120 बँकेच्या शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 50 ते 55 शेतक-यांनी आपले कृषी कर्ज वन टाइम सेटलमेंट केले आहे. यामुळे जिल्ह्यातच अश्या शेतकऱ्यांची संख्या सहा हजाराच्या जवळपास आहे ज्यांना नवीन कृषी कर्ज नाकारला जातं आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यात 55 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. या शेतकऱ्यांचे सीबीएल (CIBIL)स्कोर कमी झाल्याने यांना आता कृषीपूरक व्यवसायाकरिता कर्ज मिळणार नाहीय. सुरवातीला वन टाइम सेटलमेंट केलेल्या काही शेतकऱ्यांना बँकेच्या व्यवस्थापकांनी नवीन कर्ज दिले मात्र त्यावर बँकाच्या वरिष्ठ कार्यालयानी त्यांना नोटीस पाठवत धोरणाच्या विरोधात का गेल्याचा खुलासा मागितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT