विकत घेता की फुकट खाता? भाजीपाला विक्रेत्याचा फलकाच्या माध्यमातून उपहासात्मक संदेश! SaamTvNews
ऍग्रो वन

विकत घेता की फुकट खाता? भाजीपाला विक्रेत्याचा फलकाच्या माध्यमातून उपहासात्मक संदेश!

भाजीपाल्याचा भाव विचारता-विचारता फुकट गाजर, ताजा वटाणा, तूरीच्या शेंगा, काकडी खाणाऱ्या फुकट खाऊंना भाजीपाला विक्रेत्याचा फलकाच्या माध्यमातून उपहासात्मक संदेश!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ : सध्या बाजारात वटाणा, तूरीच्या शेंगा, गाजर आदी शेतमालाची बाजारात लहान व्यवसायिक हात गाड्यावर विक्री करत आहेत. मात्र, भाजीपाल्याचा भाव विचारता-विचारता मूठ भर शेंगा ग्राहकांकडून फस्त केल्या जात असल्याने लहान व्यवसायिकांना दिवसाला नकळत दोनशे ते तीनशे रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. याला कंटाळून काही रस्त्यावरील लहान हातगाडी व्यवसायिकांनी चक्क फुकट शेंगा खाणाऱ्या ग्राहकांना फलक द्वारे 'कृपया फुकट शेंगा खाऊ नये' असा उपहासात्मक संदेश दिल्याचे ठिक ठिकाणी दिसून येतेय.

हे देखील पहा :

रस्त्यावरील लहान हात गाडी वर भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे वातानुकूलित वाहनातून येणारे ग्राहक गाडीवरील भाजीपाला, आपली स्वतःची खाजगी मालमत्ता समजून खात राहतात. असंख्य ग्राहक दिवसभर मूठ-मूठ वटाणाच्या शेंगा, गाजर आदी वस्तू फुकटातात खातात.

किमान साठ रूपये किलो असणारी वटाण्याची शेंग ग्राहकांकडून फुकटात फस्त केली जात असल्याने रस्त्यावरच्या लहान व्यावसायिकांचे दररोज दोनशे ते तीनशे रूपयांचे नुकसान होत आहे. या फुकटखाऊ ग्राहकांना कंटाळून यवतमाळमधील गोलाप ठाकरे या भाजीपाला विक्रेत्याने थेट ग्राहकांशी तोंडाने न बोलता फलक लावून फुकट्या ग्राहकांना कृपया फुकटच्या शेंगा खाऊ नये असा उपहासात्मक संदेश दिला आहे. सध्या या विक्रेत्याच्या या फलकाची आणि व्हायरल होणाऱ्या फोटोची यवतमाळमध्ये मोठी चर्चा सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT