आडते बाजारात उडदाची आवक सुरू झाली आहे. 
ऍग्रो वन

यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : गेल्या तीन चार वर्षांपासून नगर जिल्हा खरिपाचे आगार बनला आहे. यापूर्वी पारनेर आणि नगर तालुक्यात वाटाणा आणि उडदाची लागवड व्हायची. परंतु त्याचा केंद्रबिंदू सरकला आहे. शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेडमध्ये उदडाची मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे. अगदी बागायती श्रीगोंदा तालुक्यातही लागवड वाढली आहे.

या पूर्वी दुष्काळा समजले जाणारे शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड हे प्रामुख्याने कपाशी आणि सूर्यफूल, मका, मटकी, मूग ही पिके घेतली जात होती. आता बहुतांशी तालुके उडदाकडे वळले आहेत.

वेळेवर पडणारा पाऊस आणि चांगला बाजारभाव या साठी कारणीभूत ठरत आहे. उडदामुळे शेतकऱ्यांचा चांगला पैसा मिळत आहे. त्यामुळेच उडदाच्या लागवडीसाठी बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असते. काही दुकानदार बियाण्याचा काळाबाजारही करीत आहेत.

हंगामाच्या सुरूवातीला ज्यांनी पेरा केला, त्यांचा उडीद काढणीला आला आहे. त्या शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. कर्जत तालुक्यात राशीनसह परिसरात व शेजारील करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधून राशीनच्या बाजारपेठेत दररोज दीडशे क्विंटल उडदाची आवक होत आहे. आडतेबाजारात दिवसाला सुमारे दहा कोटींची उलाढाल होत असल्याने शेतकऱ्यांसोबत व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

यंदा बारडगाव, येसवडी, पिंपळवाडी तलवडी, चिलवडी तसेच राशीन परिसरातील बारा वाड्या आणि करमाळा तालुक्यातील वीट, सावडी, कोर्टी, घरतवाडी, कुंभारगाव या भागात उडीदाचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले. त्यामुळे राशीनच्या बाजारपेठेत दररोज उडदाची विक्रमी आवक होत आहे.

मालाच्या दर्जानुसार प्रति क्विंटलला सात हजारांपासून पाच हजारापर्यंत बाजारभाव मिळत आहे. उडीदाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने आडतेबाजार चांगलाच फुलला आहे. शेवटच्या टप्प्यात एक दमदार पाऊस झाला असता तर यापेक्षाही उडीदाचे विक्रमी उत्पादन झाले असते.

पावसाच्या हुलकावणीचा अनेक शेतकऱ्याच्या उत्पादनावर परिणाम झाला तर कोरडवाहू क्षेत्रातील काही भागातील उडीद करपून गेला. दर्जेदार उडीद भाव खाऊन जात असल्याने शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळू लागलाय. गेल्या वर्षींच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली नाही तर आणखी उत्पादन वाढले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT