sangli crime news, fertilizer, sangli police saam tv
ऍग्रो वन

Sangli : लाखाे रुपयांचा बोगस रासायनिक खत साठा जप्त; मणेराजुरीतील दाेघे अटकेत

शेडमध्ये विना लेबल रासायनिक मिश्र खत, गोळी व दाणेदार खत यांची पन्नास किलो वजनाची पोती पथकास आढळली.

विजय पाटील

सांगली : कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने पोलासांसमवेत (police) सांगली (sangli) जिल्ह्यातील तासगाव (tasgoan) तालुक्यातील मणेराजुरी येथील मळ्यात छापा टाकला. या छाप्यात तब्बल सात लाख 78 हजाराचे बोगस रासायनिक खताचा साठा जप्त करण्यात आला. गुजरात मधील नँशनल फर्टिलायझर या नावाने संबंधित खताचे (fertilizer) पँकिंग करुन ते विक्रीसाठी बाजारात आणले जाणार हाेते असे तपासात निदर्शनास आले. (sangli latest marathi news)

हा छापा गुण नियंत्रक पथक आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने मणेराजुरी येथील एका पोल्ट्री शेडवर टाकला. यावेळी ट्रक मधून खताची पोती उतरविण्यात येत होती. शेडमध्ये विना लेबल रासायनिक मिश्र खत, गोळी व दाणेदार खत यांची पन्नास किलो वजनाची पोती पथकास आढळली.

या पथकास घटनास्थळी खत निर्मिती विक्रीचा परवाना (licence) नसताना साठा, पँकिंग करण्यात येत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी 36.90 टन खत बनावट असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले आहे. या खताची बाजारी किंमत सात लाख 38 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पथकातील अधिकारी यांनी दिली.

या प्रकरणी खताचा व्यवसाय करणारे मुजाहिद मुजावर (वय 25) व रमजान मन्सूर मुजावर (वय 27) दोघे राहणार मणेराजुरी या दोघांविरुध्द तासगाव पोलीस ठाण्यात (tasgoan police station) गुण नियंत्रक सुरेंद्र पाटील यांनी तक्रार नाेंदवली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT