पावसाअभावी खराब झालेल्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ भूषण अहिरे
ऍग्रो वन

पावसाअभावी खराब झालेल्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ

धुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने पेरणी नंतर दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने पेरणी नंतर दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तसेच पावसाअभावी खराब झालेल्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ देखील शेतकऱ्यांवर आली आहे. Time for farmers to plow crops due to lack of rains

शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील चोरझिरा शिवारात पावसाअभावी ८ एकर क्षेत्रावरील कोरडवाहू कापूस पिकावर रोटावेटर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच पेरण्यांची कामे देखील खोळंबली आहेत. कोरडवाहू क्षेत्रावर कापसाची दुबार लागवड करावी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

हे देखील पहा -

शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात पावसाचे मृग नक्षत्र कोरडेच गेले. पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे पेरणीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. बागायती कापसाची लागवड येथे पुर्ण झाली आहे. मात्र, १५ जून रोजी झालेल्या पावसाच्या भरवशावर येथील शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रावरही कापूस पिकाची लागवड उरकुन घेतली.

मात्र लागवडीनंतर एक थेंब देखील पाऊस न झाल्यामुळे लागवड केलेले कापूस पिक संपूर्ण वाया गेले आहे. मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. एक आठवडा उलटला मात्र, पावसाअभावी पेरणी करण्यासाठी आणलेले बियाणे अद्याप घरातच पडुन असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

BJP Leader Shot : भाजप नेत्यावर दिवसाढवळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या, ५ जण घरात घुसलं अन्...

Ahmednagar Tourism : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला खूप आवडते? मग, अहमदनगरमधील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट

Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

WhatsApp Account: आता एक WhatsApp अकाउंट चार डिव्हाइसवर चालेल, करा 'या' काही सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT