बुलढाणा: अकोला - अमरावती (Amravati) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे (Farmer) स्वप्न धुळीला मिळाले. अनेकांनी कर्ज काढून शेती पेरली, पीक ही चांगलं उगवलं, मात्र पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे सगळंच हिरावून घेतलं. बुलढाण्यातील (Buldhana) देऊळगाव पातुर्डा परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
नदी तशी छोटी आहे. पण तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने या नदीचे पाणी सामावून घेण्याची क्षमता संपली आहे आणि हे पुराचं सर्व पाणी नदीकाठ परिसरात असलेल्या शेतीत शिरले आहे. यामुळे या परिसरातील हजारो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर अशी पीक पाण्याखाली गेली आहेत. पूर्णा नदीकाठी असलेल्या सर्व शेतात हीच परिस्थिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव पातुर्डा या गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
हे देखील पाहा -
सगळीकडे शेतात पाणीच पाणी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव गावच्या पूर्णा नदीकाठच्या शेतीची. मेहनतीने व कर्ज काढून पेरलेली शेती, पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेली. शेतात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी असल्याने पूर्ण पीक पाण्याखाली गेल्याने या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले आहे.
आता या शेतकऱ्याला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे. यांच वर्षभराच्या स्वप्नांचा या पुरामुळे चुराडा झाला आहे. अनेकांनी कर्ज काढून शेती पेरल्याने आता कर्ज कसं फेडायचे यांच्या विवंचनेत या शेतकऱ्यांचा दिवस मोठा होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.