Akola News
Akola News Saam tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांची चिंता वाढली; नाफेडची खरेदी बंद होताच हरभऱ्याचे भाव पडले

अॅड. जयेश गावंडे

अकोला - शेतकऱ्यांना शेती पिकाचा हमीभाव मिळावा यासाठी नाफेड आणि एफसीआयकडून शासन हमीभावात खरेदी सुरू होती. परंतु, ही खरेदी बंद होताच खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे भाव कोसळले. अकोला (Akola) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सरकारच्या हमीभावपेक्षा हजार ते बाराशे रुपये क्विंटल कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे नाफेडची खरेदी सुरू करावी यासाठी मागणी केली असल्याचे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी अकोल्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात।हरभरा पिकाचे शासन हमीभावाचे खरेदी केंद्र सुरू होते. दोन तीन दिवसांपूर्वी कुठलीही सूचना न देता खरेदीचे पोर्टल बंद झाले. त्यामुळे हरभरा खरेदी बंद झाली. परिणामी, बाजारपेठेत व्यापारी उर्वरित शेतकऱ्यांकडील लाखो क्विंटल हरभऱ्याला हमीभावाच्या एक हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करत आहे.

हे देखील पाहा -

केंद्र शासनाने हरभरा पिकाला पाच हजार 230 रुपये प्रति क्विंटल हमीभाव दिला आहे. मात्र, व्यापारी चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा घेऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत. खरीप हंगामात शेतकरी बी-बियाणे खते आदींच्या कामासाठी पैशाची जुळवाजुळव करत असताना नाफेड खरेदि बंद करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे.

नाफेड ची 25 टक्के खरेदीपूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात हरभरा घरी पडून म्हणून केंद्र सरकारकडे नाफेड खरेदीसुरू करावी यासाठी मागणी केली असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT