मेहेकर ते सिंदखेडराजाला जोडणारा पुल गेला वाहून; खासदारांनी केली पाहणी
मेहेकर ते सिंदखेडराजाला जोडणारा पुल गेला वाहून; खासदारांनी केली पाहणी संजय जाधव
ऍग्रो वन

मेहेकर ते सिंदखेडराजाला जोडणारा पुल गेला वाहून; खासदारांनी केली पाहणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा - आज सिंदखेडराजा व मेहकर तालुक्यातील सवडद, मोहाडी, आमखेड, हिवरखेड,अंबाशी शिवारामध्ये ढगफुटी व अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या Farmer बांधावर खासदार प्रतापराव जाधव Prataprao Jadhav यांनी जाऊन भेट घेवून शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच मधला मार्ग सिंदखेडराजा ते मेहेकरला जोडणारा एकमेव पुल वाहून गेल्याने ये जा करणाऱ्यांची पंचायत झाली आहे. पुल त्वरित दुरस्ती करुण देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खासदारांनी जिल्हा परिषेद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियणत्याला सूचना देऊन पुल १५ दिवसात तयार करा असे आदेश दिले आहे.

हे देखील पहा -

येथील नदीकाठची दोन्ही बाजूला पेरलेली शेती खरडून गेली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील माती वाहून गेली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचे नुकसान झाले आहे. तसेच आमखेड येथील तलाव प्रचंड पावसामुळे फुटला होता त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

Hapus Mango : देवगडचा की दक्षिण भारतातला? खरा हापूस आंबां कसा ओळखायचा?

SCROLL FOR NEXT