Swabhimani Shetkari Sanghatana, ichalkaranji, Raju Shetti saam tv
ऍग्रो वन

Swabhimani Shetkari Sanghatana Jan Akrosh Morcha : सरकारी पाेपट काय म्हणतयं... इचलकरंजीत 'स्वाभिमानी' चा जन आक्राेश माेर्चा

माेर्चेक-यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Swabhimani Shetkari Sanghatana News : वाढत्या महागाईच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातल्या इचलकरंजीत जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी संघटनेने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला. यावेळी माेर्चेक-यांनी सरकारी पाेपट काय म्हणतयं... अनुदान द्यायला नाय म्हणतयं अशा घाेषणा देत सरकारचा निषेध व्यक्त केला. (Maharashtra News)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाला (morcha) सुरुवात झाली. इचलकरंजीच्या राजवाडा चौकातून सुरू झालेला मोर्चा हा प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला.

भर उन्हात निघालेल्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेेते. यावेळी माेर्चेक-यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे.

इंधनाचे दर का कमी केले जात नाही, स्वयंपकाचा गॅसच्या वाढलेल्या किंमती, रायसायनिक खतांमध्ये माेठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक गर्तेत सापडली आहे. सरकारने भावनिक मुद्दे उपस्थित करुन अथवा राजकीय स्टंट करुन देशातील जनतेचे मुलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्याचे थांबवा. लाेकांना तुमचा डाव लक्षात आला आहे. अजूनही वेळ गेलेली महागाई नियंत्रणात आणा अन्यथा जनता तुम्हांला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही हाच इशारा देण्यासाठी आजचा माेर्चा हाेता असे राजू शेट्टींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT