Solapur News Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून कोथिंबीर लागवड; अनोख्या प्रयोगातून सोलापूरच्या शेतकऱ्याला होतोय फायदा

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील हराडवाडी गावामध्ये राहणाऱ्या शेतकरी लक्ष्मण दत्तात्रय शेळके यांनी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून ३० ते ३५ किलो धने लावून कोथींबीरची लागवड

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पारंपरिक शेती करणे आता परवडत नाही. शिवाय निर्सगाच्या लहरीपणामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचे होत असते. यामुळे शेतकरी शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. ऊसाच्या शेताता आंतरपीक म्हणून कोथिंबिरीची लागवड केली आणि तीनच दिवसांमध्ये ४० ते ५० हजार रुपये कोथिंबीर विक्रीतून कमविले आहेत. सध्या कोथिंबीरचे दर हे चांगलेच वधारले आहेत. बाजारामध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीला ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील हराडवाडी गावामध्ये राहणाऱ्या शेतकरी लक्ष्मण दत्तात्रय शेळके यांनी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून ३० ते ३५ किलो धने लावून कोथींबीरची लागवड केली आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना (Farmer) कोथिंबीरची लागवड करताना अनेक अडचणी येत असतात. लक्ष्मण यांनी लागवड करताना संभाव्य धोका ओळखून पाईपद्वारे या कोथिंबिरीला पाण्याचे नियोजन केले. त्यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्यांच्या कोथिंबिरीला पाणी पडत राहिल्याने पीक जोमात आले.

तर १ लाखापर्यंत उत्पन्न 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरला समाधानकारक दर मिळू लागले आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या एका जुडीला तब्बल ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. यामुळे हराडवाडी येथे राहणारे शेतकरी लक्ष्मण शेळके हे स्वतः बाजारात जाऊन कोथींबीरची विक्री करत असुन एक पेंडी ५० ते ६० रूपयात विकत आहेत. हाच भाव कोथींबीरचा कायम राहिला तर या कोथींबीर विक्रीपासून १ लाख रुपयेपर्यंत उत्पन्न मिळू शकेल; असा विश्वास शेतकरी लक्ष्मण शेळके यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

Mumbai Crime: साहेब मला अटक करा मी..., बहिणीच्या बॉयफ्रेंडची हत्या करून आरोपी पोलिस ठाण्यात गेला; मुंबई हादरली

Kunkeshwar Temple : कोकण दर्शनात ‘कुणकेश्वर मंदिर’ ठरेल ट्रिपसाठी खास; वाचा नव्या डेस्टिनेशनचे वैशिष्ट्य

Jio Recharge Offer: बल्ले-बल्ले! जिओ दररोज देणार फ्री २.५ GB डेटा अन् ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT