सोयाबीनचा उतारा घटला, तर भाव घसरल्याने पेरणी खर्चही निघेना...
सोयाबीनचा उतारा घटला, तर भाव घसरल्याने पेरणी खर्चही निघेना... राजेश काटकर
ऍग्रो वन

सोयाबीनचा उतारा घटला, तर भाव घसरल्याने पेरणी खर्चही निघेना...

राजेश काटकर

परभणी: दिवाळीला पैसा हवा असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात शेतकरी विक्रीसाठी घेऊन येत आहेत. मात्र काडीकचरा अतीपावसाने काळेपणा व आर्द्रतेच्या नावाखाली व्यापारी शेतकऱ्यांना कवडीमोल दर देऊन खरेदी करत आहेत. त्याचबरोबर उताऱ्यातही कमालीची घट होत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून उताऱ्यात घट होऊन भावही घसरला आणि शेतात घातलेला खर्चही निघेना अशी वेळ शेतकऱ्यावर आली आहे. (Soybean prices fall, farmers worried)

हे देखील पहा -

परभणी जिल्हात मागील काही वर्षापासून शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन व कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहे 20-21 या आर्थिक वर्षात 5 लाख 21 हजार हेक्टरवर सोयाबीन कापूस व इतर खरीप पिकांची पेरणी केली. त्यात सोयाबीनची तब्बल अडीच लाख हेक्टरवर पेरणी झाली. पेरणी करताना सोयाबीनचा दर दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होता, त्यामुळे ह्याही वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळेल ही अपेक्षा होती. खरीप पेरणी केल्यावर सोयाबीन पीक जोमात आले, नंतर पावसाने कहर केला व बऱ्याच ठिकाणी नुकसानीचा सामना करावा लागला. सध्या सोयाबीन बाजारात येत असून दिवाळी व रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना पैसा हवा असताना व्यापाऱ्यांनी सोयाबीनचा भाव निम्म्यावर आणून ठेवला आहे.

सोयाबीनचा भाव सध्या 5 हजार दोनशे ते 5 हजार 500 पर्यंत आहे. ज्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती ती अपेक्षा विक्री करताना पूर्ण झाली नाही. त्यामुळे सोयाबीनचा उतारा घटला, दरही घसरला त्यामुळे हातात काही राहण्याऐवजी सोयाबीनवरचा खर्चही निघेना. दिवाळी कशी होणार याची चिंता लागली आहे. खरिपाच्या सोयाबीन कापूस पिकांवर दिवाळीसह रब्बी पेरणीचे नियोजन करत वर्षभराचे आर्थिक नियोजन असते, पण सोयाबीनचा उतारा व असलेला भाव ह्या कारणाने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

यावर्षी खरिपामध्ये सोयाबीनचा पेरा अडीचलाख हेक्टर होता. झालेल्या पावसाने पिके उध्वस्त झाली तर बाजारात कवडीमोल भावाने विक्री होत आहेत. ह्यामध्ये दिवाळी तर सोडा पण खर्च निघणे मुश्किल आहे. सरकारने प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT