नाशिक: लस न घेतलेल्यांना रेशन न देण्याच्या सूचना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक ग्रामपंचायतीनं दिल्या आहेत. तर लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस उलटूनही दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना शासकीय कार्यालयातून कोणतेही दाखले आणि कागदपत्रं देण्यात येणार नसल्याच्याही सूचना देण्यात आल्यात. ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आहे. (No vaccine, no ration in 'manori badruk' village of Nashik ...)
हे देखील पहा -
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील काही गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं काही गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर या पार्श्वभूमीवर मानोरी ग्रामपंचायतीनं मात्र वेगळाच निर्णय घेतलाय. तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काही ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आले असून ग्रामपंचायत पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्यात येतेय. मानोरी ग्रामपंचायत आणि मंडळ अधिकारी यांच्या बैठकीत १८ वर्षांवरील नागरीकांचं १०० टक्के लसीकरण करुन घेणं, ज्या नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, मात्र ८४ दिवस पूर्ण होऊन देखील ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही, अशा नागरीकांना शासकीय कार्यालयातून कोणत्याही प्रकारचे दाखले अथवा कागदपत्रं न देणे असा कडक निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे ज्या नागरीकांनी अद्याप लस घेतलेली नाही, अशा नागरीकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरीत न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लसीकरणासाठी जनजागृतीदेखील सुरू करण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.