सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त संजय राठोड
ऍग्रो वन

सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात, उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

सतत दीड महिन्यापासून पडणारा पाऊस यामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : सतत दीड महिन्यापासून पडणारा पाऊस यामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी झाली आहे. आता उरले सुरले सोयाबीन मशीनने काढले जात आहे. मात्र शेतात पाणीच- पाणी असल्याने शेतकऱ्यापुढे नवी समस्या उभी राहिली आहे. सोयाबीन पाण्यात चिखलात उभे आहे, ते कसे काढावे या विवंचनेत शेतकरी आहे.

हे देखील पहा-

मजूर लावून काढले तर अडीच हजार रूपये एकर काढणी आणि ३०० रुपये प्रति पोते मळणी हा भाव द्यावा लागतो. त्यामुळे सोयाबीन लावगडीचाही खर्च निघेनासे झाले आहे. अशात उत्तरप्रदेश, हरियाणा इथून चेन असलेल्या मशीन सोयाबीन काढणीस दाखल झाले आहेत. चिखल पाण्यात देखील या मशीन सोयाबीन काढत आहेत.

सोयाबीन कापणीचा हंगाम ऐन तोंडावर आला असताना धो- धो पाऊस कोसळत आहे. पाऊस न थांबल्यास सोयाबीनची कापणी कशी करावी. असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. अतिपावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्याही निम्म्याहून कमी खर्चात यामुळे शेतकऱ्यांना मशीनचा मोठा आधार झाला आहे. मजुरांच्या समस्या आटोक्यात येण्यास मदत झाली असली, तरी शेतात पाणी असल्याने मशीनचा देखील नाईलाज झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT