सोयाबीनवर सध्या रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. 
ऍग्रो वन

गेल्या वर्षी सोयाबीनबाबत तक्रारींचा "पाऊस", यंदा एकही नाही

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आणि हे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने नगदी पीक समजले जाते. जिल्ह्यात गेल्या वर्षी 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी आतापर्यंत 3 लाख 55 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

गेल्या वर्षांमध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. या संदर्भात जिल्ह्यातील 3045 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने या वर्षी कृषी विभागाने खबरदारी ठेवत पेरणीपूर्वी प्रत्येक गावागावात बीज प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिक सादर केले. Soybean crop germination is good in Buldana district this year

त्याचबरोबर शेतकऱ्यांकडील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची एकही तक्रार कृषी विभागाकडे प्राप्त झाली नाही. हे कृषी विभागाने घेतलेल्या मेहनतीचे फलितच म्हणावे लागेल.Soybean crop germination is good in Buldana district this year

यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान टाळले जाऊ शकले. आता जिल्हाभर पिकांची चांगली परिस्थिती असून शेतकरी समाधानी दिसतोय, मात्र, काही ठिकाणी या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा व खोडमाशी आक्रमण करीत आहे, याबाबतदेखील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- अनिसा महाबळे, कृषी विकास अधिकारी.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT