Solapur News Saam tv
ऍग्रो वन

Solapur: ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

ओला दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्‍ह्यातील अनेक भागात अतिवृष्‍टी व परतीच्‍या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. यामुळे जिल्‍ह्यात ओला दुष्‍काळ जाहीर करून सरसकट भरपाई जाहीर करण्याची मागणी (NCP) राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी (Solapur) सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, प्रदेश सचिव नलिनी चंदेले, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, शहराध्यक्ष सुनीता रोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष राजश्री ताड यांच्यासह शहर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

जिल्‍हाधिकारींना दिले निवेदन

ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्‍टरी सरसकट पन्नास हजार नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व विज बिल माफ करा, पिक विम्याची रक्कम तात्काळ द्या, खरडून गेलेल्या जमिनीला तात्काळ नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच याबाबत निवेदन देखील दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT