Water
Water  Saam TV
ऍग्रो वन

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील सात प्रकल्पांत ९० टक्क्यांवर जलसाठा; रब्बी हंगामाची समस्या मिटली

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. सात प्रकल्पांत ९० टक्क्यांच्यावर जलसाठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकेही घेता येणार आहे.

यंदा अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तब्बल दोन ते अडीच महिने सतत पाणी सुरू होता. वर्धा जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस (rain) पडला. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागला. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात सात मोठ्या प्रकल्पांत ९० टक्क्यांच्यावर जलसाठा आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील सिंचनाची समस्या मिटली असून उन्हाळ्यातही पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही. जिल्ह्यातील बोर प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, धाम प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प आणि सुकळी लघू प्रकल्पात ९० टक्क्यांच्यावर जलसाठा आहे.

इतर धरणेही पाण्याने तुडूंब भरली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात यंदा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. यंदा पाऊस शंभर टक्के पडला. तर थंडीनेही जोर पकडला आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडीसुद्धा पोषक आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल,अशी शेतकऱ्यांना (farmers) अपेक्षा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT