Sangli News Saam tv
ऍग्रो वन

Sangli News : निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हतबल; पाच एकर द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

Sangli News : सांगलीच्या तासगाव तालुक्याची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून आहे. येथील मातीमध्ये उत्तम दर्जाची द्राक्षे तयार होतात.

विजय पाटील

सांगली : शेतात पिकांची लागवड केल्यानंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. हि परिस्थिती दरवर्षीची असल्याने शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायची चिंता शेतकर्यांसमोर असते. हीच परिस्थिती सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर ओढावल्याने निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, कर्ज आणि सतत पडणारे द्राक्षाचे भाव यामुळे उत्पादनात होणारे आर्थिक नुकसान याला कंटाळून पाच एकर द्राक्ष बाग काढून टाकली आहे. 

सांगलीच्या (Sangli) तासगाव तालुक्याची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून आहे. येथील मातीमध्ये उत्तम दर्जाची द्राक्षे तयार होतात. या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणून द्राक्ष पीक ओळखले जाते. गावातील (Farmer) शेतकरी रामचंद्र जाधव यांची दहा एकर द्राक्ष बाग होती. यामध्ये सोणाक्का, तास ए गणेश, सुपर, थॉमसन वाणाची द्राक्ष उत्पादित केली जात होती. द्राक्ष शेतीमधून चांगले उत्पन्न मिळत होते. आर्थिक उत्पन्न सुद्धा चांगले वाढत होते. मात्र लहरी निसर्ग, वातावरणातील बदल, महागाई, द्राक्षाचे कमी होणारे दर, वाढलेले औषधाचे भाव, आवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर, वाढता उत्पादन खर्च या कारणामुळे द्राक्ष शेती तोट्यात जात आहे. यामुळे दर वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. 

दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे बागेसाठी काढलेले कर्ज भरणे सुद्धा मुश्किल झाले आहे. कर्ज काढून बाग पिकवून नफा शिल्लक राहत नव्हता, बँकांचा कर्ज वसुलीसाठी तगादा होता. मागील चार- पाच वर्षापासून द्राक्ष शेती समोर संकटाची मालिका सुरू आहे. द्राक्ष शेतीतून लाभ अजिबात नाही. कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. हि सर्व परिस्थिती पाहता नाईलाजाने पाच एकरातील द्राक्ष बाग रामचंद्र जाधव यांना काढून टाकावी लागली आहे. शासनाचे याबाबत धोरण उदासीन आहे. यामुळे द्राक्ष बाग काढावी लागल्याचे शेतकरी जाधव सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT