Sangli News Saam tv
ऍग्रो वन

Sangli News : ऊस तोडणी बंद पाडत कारखान्यात जाणाऱ्या ट्रॅक्टरची सोडली हवा; सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटले

Sangli News : ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये आणि यंदाची ३ हजार ५०० रुपये पहिली उचल कुणीही देण्याची तयारी दर्शवली नाही

Rajesh Sonwane

सांगली : गतवर्षी दिलेला उसाचा गाळपचा बाकी असलेला दुसरा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी (farmer) अनेकदा मागणी करून देखील हा हप्ता देण्याची तयारी कारखान्यांनी दर्शविली नाही. या (Sangli) विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळेच संतप्त होत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत कारखान्यात जाणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडली आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटले आहे. सर्वोदय आणि सांगली साखर कारखान्यावर जात असणाऱ्या उसाचे ट्रॅक्टर अडवून हे आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये आणि यंदाची ३ हजार ५०० रुपये पहिली उचल कुणीही देण्याची तयारी दर्शवली नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत आंदोलन उभारले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात उसाच्या (Sugarcane) प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. आज सकाळी सांगलीच्या तासगाव तालुक्यातील नागाव पाचवा मैल या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत ऊस तोडी आणि वाहतूक रोखली आहे. ऊस घेऊन कारखान्यात जाणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT