Watermelon Farming Saam tv
ऍग्रो वन

Watermelon Farming : एक एकर क्षेत्रातून ४० टन टरबूज उत्पादन; माजी सैनिकाचा यशस्वी प्रयोग

Sangli News : सांगलीच्या मिरज तालुक्यातील पाटगाव या गावातील माजी सैनिक असलेले मानाजी पाटील हे देशसेवेचे कार्य पार पाडल्यानंतर आता शेती करण्याकडे वळले आहेत. शेतीत नवीन प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न

विजय पाटील

सांगली : सध्या टरबूज उत्पादन निघण्यास सुरवात झाली आहे. यंदा चांगले उत्पादन येत असून सांगलीतील मिरज तालुक्यातील पाटगाव येथे एका माजी सैनिकाने टरबूजचे भरघोस उत्पादन घेतले आहे. एक एकर शेतातून शेतकरी मानाजी पाटील यांनी जवळपास ३५ ते ४० टन टरबूज फळांचे उत्पादन घेतले आहे. त्याचा प्लॉट पाहण्यासाठी जवळपासच्या शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

सांगलीच्या मिरज तालुक्यातील पाटगाव या गावातील माजी सैनिक असलेले मानाजी पाटील हे देशसेवेचे कार्य पार पाडल्यानंतर आता शेती करण्याकडे वळले आहेत. शेतीत नवीन प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. यामुळेच पाटगावमध्ये पहिल्यांदाच माजी सैनिकांनी कलिंगड पिकाचे उत्पादन घेतले आहे. येथील शेतकरी शाळू, ऊस, द्राक्ष बाग, मका आदी पिके घेतात. मात्र पाहिल्यादाच कलिंगड पिकाचे उत्पादन घेत आले आहे. त्यात यशस्वी झाले आहेत.

गावात प्रथमच लागवड 
तानाजी पाटील यांनी पहिल्यांदाच कलिंगड पीक आपल्या शेतात लागवड केली आहे. त्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे. दरम्यान पाटगाव या गावात पहिल्यांदाच कलिंगडचा प्लॉट घेण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी यशस्वी झाले असून हा प्लॉट पाहण्यासाठी गावातील अन्य शेतकरी मोठी गर्दी करत आहेत. तसेच तानाजी पाटील यांच्याकडून ते याबाबत माहिती देखील जाणून घेत आहेत. 

दीड लाखाचा नफा 

टरबूजचे उत्पादन कमी कालावधीचे आहे. अर्थात कमी कालावधी म्हणजे अवघ्या दोन महिन्यातच अधिकचे उत्पादन मिळाले आहे. यामध्ये एकरी तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असून खर्च वजा दीड लाख रुपये नफा मिळेल; अशी अपेक्षा शेतकरी तानाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे. अर्थात तानाजी पाटील यांनी केलेला प्रयोग यशस्वी व फायद्याचा ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT