Farmer Suicide; शेतकरी आत्महत्या थांबणार कधी? एकाच गावात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या संजय जाधव
ऍग्रो वन

Farmer Suicide; शेतकरी आत्महत्या थांबणार कधी? एकाच गावात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मागील ३- ४ वर्षांपासून सतत होणारी नापिकी... या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नष्ट झालेले पीक, आणि डोक्यावर कायम असलेला कर्जाचा डोंगर.. जणू हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेल

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : मागील ३- ४ वर्षांपासून सतत होणारी नापिकी... या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नष्ट झालेले पीक, आणि डोक्यावर कायम असलेला कर्जाचा डोंगर.. जणू हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेल आहे. या सर्वांच्या जाचाला कंटाळून बुलढाणा जिल्ह्यात एकाच गावातील शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडले आहेत, यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हे देखील पहा-

बुलढाणा तालुक्यातील खूपगाव येथील सिद्धेश्वर जाधव या ४५ वर्षीय शेतकऱ्यांकडे ४ एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला, त्यांच्याकडे एचडीएफसी बँकेचे जवळपास दीड लाख रुपये आणि त्यांनी ट्रॅक्टर घेतल्याने ५ ते ६ लाख रुपये त्याचे हप्ते बाकी असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे त्यांचे पूर्ण ४ एकरातील सोयाबीन पीक नष्ट झाल्याने ते गेल्या ३- ४ दिवसापासून चिंतेत पडले होते. त्यामुळे कर्जाचे हप्ते कसे चुकते करायचे. मुला- मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करायचे. या संपूर्ण विचाराने ते चिंतेत पडले असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगत होते. आणि त्यामुळेच त्यांनी 29 सप्टेंबर दिवशी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर २ दिवस बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल त्यांची रुग्णालयात प्राणज्योत मालवली त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

दुसरीकडे याच गावातील शेतकरी पुत्र संदीप लक्ष्मण नावकर यांनी देखील सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संदीपचे वडील अपंग आहेत आणि आई देखील नेहमीच आजारी राहत असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही संदीपवर होती. संदीप यांच्या वडिलांच्या नावावर जवळपास २ एकर शेती आहे. या वेळेस अतिवृष्टी झाल्याने शेतातील सोयाबीन पीक पूर्णपणे सडून नष्ट झाले आहे. त्यांच्यावर देखील सेंट्रल बँकेचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. आई- वडिलांचा आजार त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. त्यातच सततची नापिकी या सर्व त्रासाला कंटाळून संदीप ने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्यापाठी मागे आई- वडील पत्नी आणि १ सात वर्षाचा मुलगा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT