Chatrapati Sambhajinagar Saam tv
ऍग्रो वन

Chatrapati Sambhajinagar : डाळिंबाच्या हजार झाडावर फिरविला ट्रॅक्टर; पाणी नसल्याने बागा वाचविण्याचा प्रश्न

Sambhajinagar News : पुरेसा पाऊस न झाल्याने या फळबागा कश्या वाचव्यात हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्या आहे. आता विहिरीने देखील तळ गाठला आहे. भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने विकत पाणी घेऊन (sambhajinagar) फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न असफल होत आहे. यामुळे शेतकऱ्याने लागवड केलेल्या एक हजार (pomegranate) डाळींबाच्या झाडांवर ट्रॅक्टर फिरविला आहे. (Breaking Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने या फळबागा कश्या वाचव्यात हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सद्यस्थितीला केवळ जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने फळबागा वाचविण्यासाठी तीन महिने विकत (Water Crisis) पाणी घेऊन बागा वाचविन्या एवढा पैसा आता शेतकऱ्याकडे शिल्लक राहिला नाही. यामुळे नाइलाजास्तव शेतकरी बांधव फळबागावर कुऱ्हाड चालवत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान जिल्ह्यातील लाडसावंगी परिसरातील एका शेतकऱ्याने पाण्याअभावी शेतातील डाळिंबाच्या बागावर ट्रॅक्टर फिरविला. साधारण एक हजार रोपांची लागवड केली होती. ही संपूर्ण झाडे शेतकऱ्याने नष्ट केली आहेत. पाण्याची समस्या जाणवत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून मोठ्या आर्थिक नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT