Sambhajinagar News Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar News : दीड एकरात पीक घेतलं, लाखोंचा खर्च; हतबल झालेल्या शेतकऱ्यानं पिकावर फिरवला रोटोव्हेटर

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी सुरेश जाधव यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावर अद्रकची लागवड केली होती

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : दीड एकर क्षेत्रात लागवड केलेल्या अद्रक पिकावर रोगाचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव पडला. हा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसल्याने नाईलाजाने हे पीक काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. मनावर दगड ठेवून शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रावरील अद्रक पिकावर रोटोव्हेटर फिरविले.  

छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) फुलंब्री तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी सुरेश जाधव यांनी आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रावर अद्रकची लागवड केली होती. गेल्या चार महिन्यापासून अद्रकची लागवड करून हे पीक जिवापाड जपलं. इतकचं नाही तर त्यासाठी ठिबक आणि शेणखत विकत घेऊन लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पूर्ण खर्च आता पाण्यात गेला आहे.

अद्रक पिकावर पडलेला रोग नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या औषधाची फवारणी केली. तरी देखील रोगावर नियंत्रण मिळविता येत नसल्याने (Farmer) शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे नाईलाजाने ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर फिरवून अद्रक भुईसपाट केली. त्यामुळे आता शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत घ्यावी, तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागाने वेळोवेळी रोगांबाबत मार्गदर्शन करावे; अशी मागणी शेतकरी वर्ग आता करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT