Sambhajinagar News Saam tv
ऍग्रो वन

Cotton Crop : कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव; उभी झाडे सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत

Sambhajinagar News : यंदा सुरवातीपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पीक वाढीसाठी चांगले पोषक वातावरण होते. मध्यंतरीच्या कालावधीत पावसाची संततधार सुरु असल्याने पिकांची वाढ खुंटली होती

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बहुतांश भागात कपाशी पिकावर मर रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतात उभी असलेली कपाशीची झाडे आता सुकु लागली आहेत. तर काही ठिकाणी अचानक पानगळ होत असल्याने झाडे मरू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. 

यंदा सुरवातीपासून जिल्ह्यात चांगला (Rain) पाऊस झाला आहे. यामुळे पीक वाढीसाठी चांगले पोषक वातावरण होते. मध्यंतरीच्या कालावधीत पावसाची संततधार सुरु असल्याने पिकांची वाढ खुंटली होती. शिवाय सततच्या पावसामुळे रोगराई पडण्यास देखील सुरवात झाली होती. तर आता कपाशीवर (Cotton Crop) मर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने झाले सुकू लागली असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यावर कोणत्याही प्रकारचा उपाय नसल्याने शेतकऱ्याचे यात मोठे नुकसान होत आहे. 

महागड्या औषधांच्या फवारण्या करूनही या रोगाचा बंदोबस्त होत नसल्याने (Farmer) शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत; अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT