मावळात भात लागवडीस जोमात सुरवत दिलीप कांबळे
ऍग्रो वन

मावळात भात लागवडीस जोमात सुरवत

मावळ तालुक्यात सध्या सात भात लागवड यंत्र उपलब्ध असून त्यामार्फत यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रात भात लागवड प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले.

दिलीप कांबळे

मावळ: पुणे जिल्ह्यातील (Pune District) मावळ तालुक्याला (Maval) भाताचे कोठार समजले जाते. मात्र मावळ तालुक्याचे वाढते शहरीकरण, मजुरांचा तुटवडा, शेतकामातील तरुण पिढीची अनास्था, अशा अनेक कारणाने भात शेती ही जिकिरीची बनली आहे. यावर एकमेव पर्याय म्हणून यंत्राद्वारे भात लागवडीकडे पाहिले जाते. मागील पाच ते सहा वर्षापासुन सातत्याने मावळ तालुक्यातील कृषी विभाग शेतकऱ्यांमध्ये यंत्राद्वारे भात लागवडीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे जनजागृती करत असल्याने दिवसेंदिवस यंत्राद्वारे भात लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे.

मावळ तालुक्यात सध्या सात भात लागवड यंत्र उपलब्ध असून त्यामार्फत यावर्षी सुमारे दोनशे एकर क्षेत्रात भात लागवड प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले. मावळ मधील शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, कृषी सहाय्यक दत्तात्रय गावडे, राहुल घोगरे यांच्या मार्गदर्शनामुळे मावळात सुगीचे दिवस आले.

यंत्राने भात लागवड केल्यास बियाण्याच्या खर्चात, लागवड खर्च व मजुरांची टंचाई तसेच मजुरीचा वाढत चाललेला खर्च या सर्व प्रश्नांची सोडवणूक होउन भात लागवड सुसह्य होण्यास मदत होते. भात लागवडीसाठी मजुरांवर अवलंबून न राहता वेळेत लागवड करता येते. भात रोपांची संख्या, दोन ओळीतील अंतर नियंत्रित रहात असल्यामुळे पिकाची वाढ जोमाने होउन किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.आंतरमशागतीची कामे व्यवस्थित करता येतात. युरिया- डिएपी ब्रिकेट गोळी खताचा वापर केल्यास अधिक फायदेशीर ठरते. तसेच उत्पादन खर्चात बचत होऊन पंधरा ते वीस टक्के उत्पादनात वाढ होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Rule: भावा,वारंवार चालान येणं चांगलं नव्हं! ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द; जाणून घ्या नवीन नियम

Pune Shocking : पुणे हादरलं! आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं, हिंजवडी आयटी पार्कात खळबळ

Maharashtra Live News Update: भर दिवसा धाडसी चोरी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Ind vs Eng : मँचेस्टरमध्ये भारताचा पराभव कसा टळला? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितला टर्निंग पॉइंट

Crime news: प्रायव्हेट पार्टला इजा अन् गळ्याला...; ५ वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार

SCROLL FOR NEXT