Latur  दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे कृषी विभाग व तहसील कार्यालयाला निवेदन

मात्र 10 ते 20 टक्के शेतकऱ्यांची नावे या पिक विमा व नुकसान भरपाईच्या यादीमध्ये आली आहेत व यांचे वाटप तेवढ्याच मर्यादित शेतकऱ्यांना झाले आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शेतकऱ्यांना अध्यापही पिक विमा नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे आज केळगाव येथील शेतकऱ्यानी (Farmer) निवेदन दिले आले. निलंगा तालुक्यातील केळगाव येथे 2021 या खरीप हंगामातील पीक विमा (Crop Insurance) अनेक शेतकऱ्यांनी भरला होता. मात्र 10 ते 20 टक्के शेतकऱ्यांची नावे या पिक विमा व नुकसान भरपाईच्या यादीमध्ये आली आहेत व यांचे वाटप तेवढ्याच मर्यादित शेतकऱ्यांना झाले आहे.

हे देखील पहा -

मात्र उर्वरित 70 ते 80 टक्के शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव आलेले नसून परिणामी पिक विमा मिळाला झाला कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यासमोर पिक विमा कंपनीमुळे नवीन संकट उभे केले आहे. खरिपाचे सोयाबीन हे अतिवृष्टी व पुराच्या पाण्यात वाहून गेले यामुळे शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. केळगाव येथील शेतकरी बांधवांनी निलंगा तहसील कार्यालय व कृषी कार्यालय निलंगा येथे निवेदन करून पीक विम्याची व नुकसानभरपाईचे लवकरात लवकर मंजुरी मिळावी व वाटप करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी मदार मागणे, तुराब मुजावर, शिवाजी कांबळे, अफसर पटेल, इनुस पठाण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एकनाथ काळे, सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहून पीक विम्याची मागणी केली आहे जर पिक विमा लवकर मंजूर नाही झाला तर कृषी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT