Raju Shetti : ऊसदर आणि एफआरपीच्या मागणीसाठी ऊस तोडणी बंद आंदोलन केले जाणार आहे. येत्या (ता. १७) आणि (ता.१८) नोव्हेंबरला दोन दिवस ऊस तोडणी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. ते सांगली येथे माध्यमांशी बोलत होते. (swabhimani shetkari sanghatana latest marathi news)
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज्यभरातील अन्य संघटनांच्या माध्यमातून राज्यात ऊसदराविषयी आंदाेलन छेडलं जात आहे. शेतक-यांना (farmers) पहिली उचल आणि अंतिम दर याेग्य मिळावा यासाठी राज्यात (maharashtra) विविध जिल्ह्यांत ऊसदर संघर्ष समिती स्थापन करुन शेतकरी संघटनांचा लढा सुरु आहे.
ऊसदर आणि एफआरपीच्या मागणीसाठी ऊस तोडणी बंद आंदोलन छेडण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली येथे दिला. ते म्हणाले सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर कारखानादार एकजूट दाखवत जर शेतकऱ्याचं पैसे बुडवत असतील तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकजूट होऊन तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.