उस्मानाबाद जिल्ह्यात संततधार; खरीप पिकांना जीवनदान
उस्मानाबाद जिल्ह्यात संततधार; खरीप पिकांना जीवनदान कैलास चौधरी
ऍग्रो वन

उस्मानाबाद जिल्ह्यात संततधार; खरीप पिकांना जीवनदान

Sanika

कैलास चौधरी

उस्मानाबाद : मागील दोन दिवसांपासून उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण तर काही प्रमाणत भिज पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणत पाणी साठा तयार झाला असून नदी, नाले, ओढे प्रवाहित झाले आहेत. काही मंडळामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तेथील खरीप हंगामातील पिकांना अती पावसाचा फटका बसला आहे.

या वर्षी पावसाने सुरुवातीच्या टप्प्यात दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने आजपर्यंत 55.7 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात 25.28 दलघमी पाणीसाठा झाला आहे. काही मंडळामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने तेथील खरीप हंगामातील पिकांना अती पावसाचा फटका बसला आहे.

तर जिल्ह्यातील काही मंडळात आवश्यकतेनुसार पाऊस Rain झाल्याने या भागातील खरीप पिके अगदी जोमाने वाढत वाढत असल्याचे पाहायला मिळते आहे. तुळजापूर आणि उमरगा-लोहारा तालुक्यातील लहान तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षापासून समाधानकारक पाऊस पडत असून, गेल्यावर्षी जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान 2073 मिमी पाऊस पडला होता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी मुंबई : बनावट नोटांच्या छापखान्यावर पाेलिसांची धाड, 2 लाखांच्या नाेटा जप्त; युवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : शेवाळेवाडीत कंटेनरचा अपघात, चालक आणि क्लीनरचा मृत्यू अपघातात मृत

SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

SCROLL FOR NEXT