पंचनामे संथगतीने होतायत, शेतकऱ्यांना लवकर मदत मिळणार कशी? अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे अतिशय संथगतीने करण्यात येत असून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळणार कशी असा सवाल उपस्थित झालाय.
ऍग्रो वन

पंचनामे संथगतीने होतायत, शेतकऱ्यांना लवकर मदत मिळणार कशी?

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे अतिशय संथगतीने करण्यात येत असून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळणार कशी असा सवाल उपस्थित झालाय.

जयेश गावंडे

अकोला - अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे अतिशय संथगतीने करण्यात येत असून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळणार कशी असा सवाल उपस्थित झालाय. गेल्या महिन्यात अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. (Punchnama process is slow, how can farmers get help soon)

हे देखील पहा -

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असले तरी, आतापर्यंत केवळ 37 हजार 360 हेक्टरवरील पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे कासवगतीने सुरु असल्याचे वास्तव समोर येत आहे. जिल्ह्यात 21 आणि 22 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नकसान झाले. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराच्या ताडाख्यामुळे जवळपास 75 हजारांच्या वर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषिसेवक यांच्या मार्फत शेतीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र बारा दिवसाचा कालावधी लोटून गेला असला तरी आतापर्यंत केवळ अर्ध्याच पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याने पंचनामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे पंचनामे पूर्ण नसतील तर लवकर मदत मिळेल कशी असा प्रश्न उपस्थित झालाय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

SCROLL FOR NEXT