satara , wai ,mahabaleshwar saam tv
ऍग्रो वन

Mahabaleshwar ला मान्सून पूर्व पावसानं झाेडपलं, वाई, केळघरात झाडं पडली; जावळीतील गावं अंधारात

विद्युत महामंडळाने खांब दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

ओंकार कदम

Satara Rain News : सातारा (satara) जिल्ह्यात साेमवारी वाई (wai), महाबळेश्वर (mahableshwar) आणि जावली तालुक्यात वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे शेतीला माेठा फटका बसू लागली आहे. त्याच प्रमाणे विद्युत खांब काेसळल्याने जावळी तालुक्यातील काही गावे अंधारात गेली आहेत.  (Maharashtra News)

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले महाबळेश्वरात मान्सून पूर्व पावसाने साेमवारी हजेरी लावली. या भागात दोन दिवसांपासून तुरळक पाऊस कोसळतो होता. मात्र साेमवारी दुपारपासून महाबळेश्वर शहरासह बाजारपेठेत पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे महाबळेश्वरात आल्हादायक वातावरण तयार झाले. पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद लुटताना दिसत हाेते.

वाईला पावसानं झाेडपलं

वाई तालुक्यातील काही भागांना साेमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठा फटका बसला. अचानक आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या आणि जाहिरातीचे फलक रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. गेल्या चार दिवसात परिसरात ढगाळ वातावरण तयार झाल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आणि बाजारपेठेत लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

जावलीतील गावे अंधारात

साताऱ्यातील जावळी तालुक्यातील केळघर परिसरात झालेल्या वळीवाच्या पावसाने घाटातील मुकवली मुरा येथील वीजेचे खांब पडले. त्यामुळे या भागातील देखील काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

वीजेच्या तारेवर झाड पडल्याने चार विद्युत पोल वाकून विजेचा तारा तुटल्या. अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे रात्री पासून या भागातील काही गावे अंधारात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT