डाळिंबाचे विक्रमी उत्पादन साम टीव्ही
ऍग्रो वन

डाळिंबाचे हेक्टरमध्ये ४२ टनांचे उत्पादन

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः शेती हा अनिश्चिततेचा व्यवसाय आहे. काही शेतकरी तर शेतीकडे उद्योग म्हणून पाहतही नाहीत. त्यामुळे सातत्याने ती आतबट्ट्यात येते. शेती असूनही इतर उद्योग व्यवसायाकडे वळण्याचे प्रमाण मोठे आहे. केळी, डाळिंब, द्राक्षे या पिकांतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. परंतु त्यावर पडणाऱ्या रोगामुळे ही पिकेही बिनभरोशाची झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील दोन तरुण शेतकऱ्यांनी डाळिंब शेती कमाल केली आहे. एक हेक्‍टर क्षेत्रामध्ये 42 टन उत्पादन घेऊन विक्रम केला आहे. कृषी महाविद्यालय पुणे यांच्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यनुभव कार्यक्रम 2021अंतर्गत विद्यालयाचे प्रा. डॉ. एच. पी. सोनवणे केंद्रप्रमुख डॉ. आर. डी. बनसोड आणि कार्यक्रम अधिकारी डॉ जयश्री पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या आकांक्षा रावसाहेब खालकर या विद्यार्थिनीने शेतकरी अजित गुडघे व गणेश गुडघे या दोन बंधुची यांची भेट घेऊन त्यांच्या शेतीचा आढावा घेतला. Pomegranate production of 42 tons per hectare abn79

जिद्द असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीही साध्य करता येते. हे दोन तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळिंब बागावर तेल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येतो. परंतु अशा परिस्थितीत योग्य फवाऱ्याचे नियोजन विशेषता जैविक पद्धतीचा वापर करून हा रोग नियंत्रणात आणता येतो, हे दाखवून दिले. दुष्काळी भागात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यांनी ही बाग फुलावली.

एक हेक्टरमध्ये 800 झाडांची लागवड केली आहे. बागेत रासायनिक खताचा अत्यल्प वापर, सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त वापर करून त्यांना हे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. परंपरागत शेती सोडून काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने हा शेतकरी शेती करतो.

डाळिंबसोबत इतर पिके म्हणजे उन्हाळी भुईमूग एकरी 25 क्विंटलचे उत्पादन घेतले आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल हे त्यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले. Pomegranate production of 42 tons per hectare abn79

नोकरीच्या मागे न धावता प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शेती सुधारणा नव नवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अजित गुडघे व गणेश गुडघे यांनी डाळिंब लागवडीतून आर्थिक प्रगतीची दिशा दाखविली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT