Amravati News
Amravati News अरुण जोशी
ऍग्रो वन

पोलीस अधिकाऱ्याने घरी फुलविली परस बाग; १७ प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड

अरुण जोशी

अमरावती - भारतीय पोलीस सेवेत असलेल्या एका युवा अधिकाऱ्याने शेतीमातीशी असलेली आपली नाळ कायम ठेवत स्वतःच्या घरापुरता सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यावर भर दिला आहे. शासकीय बंगल्याच्या परिसरात असलेल्या परसबागेचे व्यवस्थापन पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) विक्रम साळी यांच्या पत्नी ऐश्वर्या आणि वडील महादेव साळी करतात. (Amravati Latest News)

सातारा जिल्ह्यातील रेठारे येथील मुळचे असलेल्या विक्रम साळी यांनी कृषी अभियांत्रिकी (Agricultural Engineering) विषयात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे वडील महादेव साळी हे सातारा येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापक होते, तर आई शोभा यादेखील एएनएम म्हणून होत्या. कुटुंब शेतीत राबत असल्याने विक्रम यांना देखील शेतीचा लळा लागला होता. त्यातूनच त्यांनी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पदवी व नंतर पदव्युत्तर कृषी अभियांत्रिकीची पदवी घेतली.

हे देखील पहा -

साळी यांनी त्यानंतर इतरांप्रमाणे नोकरीचा शोध सुरू असताना त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्धा येथे उपविभागीय कृषी अधिकारी नियुक्ती मिळाली. परंतु त्यातही मन न रमल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्याआधारे त्यांची सहायक वनसंरक्षकपदी नेमणूक झाली. परंतु तेथेही न रुळलेल्या विक्रम साळी यांनी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षात ते पास झाले. त्यातून त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नेमणूक झाली. सद्यःस्थितीत पदोन्नतीने ते अमरावती पोलीस उपायुक्त आहेत. आपल्या घरच्या शेती मध्ये ते दररोज सकाळी शेतीचे कामे करतता यावेळी पत्नी ऐश्वर्या आणि वडील हे सुद्धा आवडीने त्यांना हातभार लावतात.

पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी घरी वांगी, टोमॅटो, दोडका, मिरची, कोबी, घेवडा, लसूण, मका, पपई, केळी या सह तब्बल १७ प्रकारचा भाजीपाला लावला आहे. सेंद्रिय पद्धतीने या परसबागेचे व्यवस्थापन ते करतात. याच बागेतील भाजीपाल्याचा रोजच्या स्वयंपाकात वापर केला जातो, असेही ऐश्वर्या विक्रम साळी यांनी सांगितले.

बंगल्याच्या परिसरात बांबूचे छोटेसे वनदेखील बनविले आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटी सोबतच संपूर्ण परिवाराला शेतीची प्रचंड आवड या मुळे परसबाग पहायला पोलीस विभागातील काही अधिकारी सुद्धा येत असून सर्व जण साळी यांचे कौतुक करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT