Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : परभणी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पाऊस नसल्याने सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

Parbhani News : राज्यातील बहुतांश भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस बरसत आहे. पाऊस उसंत देत नसल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करण्यास देखील मिळत नसल्याचे चित्र आहे

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जून महिन्यात पडलेल्या थोडा फार पावसात पेरणी उरकून घेतली होती. पण पावसाने जून महिन्यात पाठ फिरवली व जुलै महिना कोरडा जात आहे. यामुळे शेतातील पिके आता कोमेजू लागली आहेत. दरम्यान पाऊस नसल्याने सोयाबीन पिकावर देखील रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

राज्यातील बहुतांश भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. कुठे मुसळधार (Rain) पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस बरसत आहे. पाऊस उसंत देत नसल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करण्यास देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान परभणी (Parbhani) जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात पाच लाख ६३ हजार हेक्टरवर खरीप क्षेत्र प्रस्तावित असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत कापसाचा पेरा वाढणार असून सोयाबीनचा पेरा तब्बल २१ हजार हेक्टरने कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.   

जून महिन्यात झालेल्या पावसात कापूस व सोयाबीनची लागवड केली. पिके अल्प पावसावर आली; पण सोयाबीनवर पाने खाणाऱ्या लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने (Farmer) शेतकरी संकटात सापडला आहे. महागडी औषधीची फवारणी करत असून कोळपणी, खुरपणी करत खर्च करत आहे. पावसाची नितांत गरज असून पाऊस पडला नाही, तर शेतकरी अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याची डोळे आकाशकडे लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT