Rabi Crops Saam tv
ऍग्रो वन

Rabi Crops : हरभऱ्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादन घटण्याची शक्यता

Parbhani News : रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. मात्र, अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली.

राजेश काटकर

परभणी : गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्यावर (Parbhani) आता ढगाळ वातावरणाचे संकट घोंगावत आहे. शिवाय आता करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने (Farmer) शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत असून, विविध फवारण्यांवर भर दिला जात आहे. (Live Marathi News)

रब्बी हंगामात (Rabi Crops) हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. मात्र, अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली. सद्यस्थितीत फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभरा पिकाला ढगाळ वातावरण व धुक्याचा फटका बसत आहे. तसेच करप्या रोगाचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी त्यावर फवारणी करत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्पादनात घट होण्याची शक्यता 

हरभऱ्याला एन बहरात असून त्याला फुल व दाणे भरण्याची वेळ आहे. अशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने त्याचा फटका हरभऱ्यावर बसत आहे. यामुळे आता हरभऱ्याच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT